Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (128.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 22/03/2019
दि ताडपत्री को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मार्च 22, 2019

दि ताडपत्री को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि ताडपत्री कोऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्रप्रदेश ह्यांना रु.2,00,000 (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित, कलम 6(1)(ग) व कलम 6(1)(के) ह्यांच्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले असल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2263

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä