यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांचेवर आर्थिक दंड लागु |
एप्रिल 10, 2019
यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, यु.पी. पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव्ह बँक लि., लखनौ ह्यांना रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून तो दंड, आरबीआयकडून पूर्व मंजुरी न घेता शाखा अन्यत्र हलविण्याबाबत आरबीआयची मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, त्या बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2420 | |