एप्रिल 16, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी
को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ
दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. एप्रिल 17, 2018 अन्वये, एप्रिल 17, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी, व सर्वात शेवटी, निर्देश दि. ऑक्टोबर 15, 2018 अन्वये, एप्रिल 17, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, सर्वात शेवटी एप्रिल 17, 2019 पर्यंत वैधता वाढविलेले, दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ह्यांना दिलेले व वेळोवेळी सुधारित केलेले एप्रिल 17, 2018 रोजीचे निर्देश, निर्देश दि. एप्रिल 9, 2019 अन्वये, वरील बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, एप्रिल 18, 2019 ते ऑक्टोबर 17, 2019 पर्यंत लागु असतील.
संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
वरील मुदतवाढ निर्देशित करणा-या निर्देश दि. एप्रिल 9, 2019 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी त्या बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतवाढीचा/बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा समजण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2468 |