गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.200 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण |
एप्रिल 23, 2019
गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.200 मूल्याच्या बँक
नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व्ह बँक, लवकरच, गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.200 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.200 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे. रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.200 च्या नोटा वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2513 | |