एप्रिल 25, 2019
बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) चे श्री. ऑगस्टिन कारस्टन्स ह्यांचे ‘सेंट्रल बँकिंग अँड इनोव्हेशन पार्टनर्स इन दि क्वेस्ट फॉर फायनान्शियल इन्फ्लुजन’ ह्या शीर्षकचे, सतराव्या सी डी देशमुख स्मृति प्रीत्यर्थ भाषण.
भारतीय रिझर्व्ह बँकेने, एप्रिल 25, 2019 रोजी मुंबई येथे, सी डी देशमुख स्मृती प्रीत्यर्थ असलेल्या सतराव्या भाषणाचे यजमानपद घेतले होते. हे भाषण, श्री. ऑगस्टिन कारस्टन्स, महाव्यवस्थापक, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटन्स (बीआयएस) ह्यांनी दिले होते. गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांनी, त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीस पाहुण्यांचे स्वागत करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर श्री. सी डी देशमुख ह्यांनी देशाच्या व रिझर्व्ह बँकेच्या केलेल्या उत्कृष्ट सेवेची जाणीव ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने, सी डी देशमुखांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या भाषण मालिकेचे महत्व ठळकपणे सांगितले.
श्री. ऑगस्टिन कारस्टन्स हे डिसेंबर 2017 पासून बीआयएसचे महाव्यवस्थापक आहेत. श्री. कारस्टन्स हे 2010 ते 2017 दरम्यान बँक ऑफ मेक्सिकोचे गव्हर्नर होते. 2011 ते 2017 दरम्यान बीआयएसच्या संचालक मंडळाचे एक सदस्य म्हणून ते ग्लोबल इकॉनॉमी मीटिंगचे व 2013 ते 2017 दरम्यान इकॉनॉमिक कन्सल्टेटिव कौन्सिलचे अध्यक्ष होते. 2015 ते 2017 च्या दरम्यान ते आयएमएफची धोरण सल्लागार समिती, आंतरराष्ट्रीय नाणेविषयक व वित्तीय समितीचेही अध्यक्ष होते. आपल्या ह्या भाषणात, श्री. कारस्टन्स ह्यांनी, एखाद्या आधुनिक अर्थव्यवस्थेमधील वित्तीय सेवांचे महत्व ठळकपणे सांगितले आणि एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन करण्यासाठी केंद्रीय बँका करु शकत असलेली अत्यंत महत्वाची भूमिका अधोरेखित केली. औपचारिक कर्ज, बचत व विमा सुविधांचा वापर वाढवून, वित्तीय समावेशन, गरीबी दूर करण्यास मदत करु शकते. पुरेशा निधीचा अभाव, वाढलेले खर्च आणि औपचारिक वित्तीय प्रणालीमध्ये विश्वासाचा अभाव हेच वित्तीय समावेशनासाठीचे काही अडथळे आहेत. श्री. कारस्टन्स म्हणले की, त्यांच्या मूलभूत मँडेट्सकडे, म्हणजे किंमत व वित्तीय स्थिरता - पाहता, केंद्रीय बँका व वित्तीय प्राधिकरणे वित्तीय प्रणालीमधील विश्वास दृढतर करु शकतात व त्यामुळे वित्तीय समावेशनाचा पायाच घातला जातो. वित्तीय समावेशनापुढील अडथळे म्हणजे उच्चतर खर्च, कर्ज इतिहास व कागदपत्रे न ठेवली जाणे - ओलांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान व खूप मोठी माहिती ह्यांचा वापर वाढविता येऊ शकतो.
‘सेंट्रल बँकिंग अँड इनोव्हेशन : पार्टनर्स इन दि क्वेस्ट फॉर फायनान्शियल इनक्लुजन’ ह्या भाषणाचा संपूर्ण मजकुर www.rbi.org.in वर उपलब्ध आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2537 |