10 मे, 2019
दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली, निर्देश दि. नोव्हेंबर 2, 2018 अन्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर केरळ, ह्यांना निर्देश दिले होते. (जे मे 9, 2019 पर्यंत लागु होते.)
ह्या निर्देशांनुसार, प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, आरबीआयच्या निर्देशांमध्ये दिलेल्या अटीवर, ठेवीदारांना रु.2,000/- (रुपये दोन हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर केरळ, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवी स्वीकारुन कोणतेही दायित्व घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्व म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी होणार नाही, आरबीआयच्या नोव्हेंबर 2, 2018 रोजीच्या निर्देशात अधिसूचित केल्यानुसार सोडल्यास, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, तिच्या मालमत्तांची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे वासलात करु शकणार नाही.
दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर ह्यांना नोव्हेंबर 2, 2018 रोजी दिलेल्या निर्देशांना, जनतेच्या हिताच्या दृष्टीने मुदतवाढ देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले असून, त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, मे 9, 2019 पर्यंत वैधता असलेले, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. ह्यांना देण्यात आलेले, नोव्हेंबर 2, 2018 रोजीचे निर्देश, वरील बँकेला, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मे 10, 2019 ते नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील. संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2649 |