Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (267.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/05/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि. दावणगेरे जिल्हा, कर्नाटक

10 मे, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि. दावणगेरे जिल्हा, कर्नाटक

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि. दावणगेरे जिल्हा, कर्नाटक ह्यांना मे 8, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून काही निर्देश दिले असून, त्यानुसार वरील बँक भारतीय रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि. दावणगेरे जिल्हा, कर्नाटक कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवी स्वीकारुन कोणतेही दायित्व घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्व म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी होणार नाही, आरबीआयच्या एप्रिल 26, 2019 रोजीच्या निर्देशात अधिसूचित केल्यानुसार सोडल्यास, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, तिच्या मालमत्तांची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य प्रकारे वासलात करु शकणार नाही. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. विशेषतः प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम आरबीआयच्या निर्देशांमधील अटीवर काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2650

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä