मे 13, 2019
दि नैनीताल बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व्ह बँकेने, आदेश दि. मे 6, 2019 अन्वये, दि नैनीताल बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.10 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने, एनपीए ओळख प्रक्रिया संपूर्णपणे स्वयंचलित करण्याबाबत आरबीआयने विशेष सूचना देऊनही तसे न केल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(आय) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लावला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनाच्या अटीवर आधारित असून, तिचा संबंध वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी नाही.
पार्श्वभूमी
मार्च 31, 2016 रोजी असलेल्या वरील बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात, ह्या बँकेने केलेल्या वैधानिक तपासणीवर आधारित, एका विशिष्ट कालावधीत, एनपीए ओळख प्रक्रिया स्वयंचलित करण्याबाबत एक विशिष्ट सूचना वरील बँकेला देण्यात आली होती. वरील बँकेच्या मार्च 31, 2017 रोजीच्या आर्थिक स्थिती संबंधित केलेल्या वैधानिक तपासणीतही वरील सूचना पुनश्च केली गेली होती व त्यासाठीचा कालावधीही वाढवून देण्यात आला होता. तथापि, वरील बँकेने वरील सूचनेचे अनुपालन न केल्याने तिला एक नोटिस (एससीएन) पाठविण्यात येऊन, वरील सूचनेचे अनुपालन न केल्याबद्दल तिला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यात सांगण्यात आले होते. वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीतील सादरीकरणे विचारात घेऊन, वरील बँकेला आर्थिक दंड लागु करण्याचे आरबीआयने ठरविले.
शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2663 |