युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. नगीना (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु |
मे 23, 2019
युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. नगीना (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. नगीना (यु.पी.) ह्यांचेवर रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, तुमचा ग्राहक जाणा वरील आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे व आरबीआयच्या तपासणी अहवालाच्या अनुपालन सादर करणे ह्यांचे उल्लंघन केले जाण्याबाबत लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2748 | |