Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (218.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/05/2019
वित्तीय साक्षरता सप्ताह 2019

मे 31, 2019

वित्तीय साक्षरता सप्ताह 2019

दर वर्षी केंद्रीकृत अशा मोहिमेद्वारे, महत्वाच्या विषयांबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी, वित्तीय साक्षरता सप्ताह हा आरबीआयने घेतलेला एक पुढाकार आहे. हा वित्तीय साक्षरता सप्ताह जून 3-7 पासून, ‘शेतकरी’ ह्या विषयावर व औपचारिक बँकिंग प्रणालीचा तो एक भाग झाल्याने त्यांना कसा लाभ होतो ह्यावर आयोजित करण्यात आला आहे.

सर्वंकष अशा आर्थिक विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक असून त्यासाठी वित्त हे अत्यावश्यक आहे. शेतकरी समाजासाठीचा कर्जप्रवाह वाढविणारी धोरणे तयार करण्यात आरबीआयचा सक्रिय भाग आहे. अलिकडील वर्षांमध्ये कर्ज देण्याची यंत्रणा सशक्त करण्यासाठी व वित्तीय समावेशनासाठी ह्या बँकेने अनेक पुढाकार घेतले आहेत.

शेतकरी समाजात जाणीव निर्माण करुन वित्तीय साक्षरतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी, हा केंद्रीकृत संदेश प्रसारित करण्यासाठी पोस्टर्स व पत्रके तयार करण्यात आली आहेत. ग्रामीण क्षेत्रातील बँक शाखा, वित्तीय साक्षरता केंद्रे एटीएम्स व वेबसाईट्स ह्यावरही ही पोस्टर्स व मजकुर प्रदर्शित करण्यासाठी बँकांना सांगण्यात आले आहे. ह्याशिवाय, शेतक-यांमध्ये आवश्यक ते वित्तीय जाणीव संदेश प्रसारित करण्यासाठी, जून महिन्यामध्ये, आरबीआय, दूरदर्शन व भारतीय आकाशवाणीवर, मोठी समाज-माध्यम मोहिम सुरु करील.

शेतकरी समाजापर्यंत पोहोचण्याचा आरबीआयचा उद्देश असून सर्व भागधारकांना विनंती केली जात आहे की, त्यांनी ही वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वी करावी.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2816

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä