Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (243.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/05/2019
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश- दि सीकेपी को - ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

31 मई 2019

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
दि सीकेपी को - ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 एप्रिल, 2014 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दि सीकेपी को - ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 2 मे, 2014 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या सुधारित निर्देशा अनुसार 31 मे, 2019 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देश व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशाचा वैधता कालावधी जो दिनांक 31 मे, 2019 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 30 मे, 2019, च्या सुधारित निर्देश द्वारा दिनांक 1 जून, 2019 ते दिनांक 30 जून, 2019 पर्यंत एक महिन्यासाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 30 मे, 2019 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता

प्रेस प्रकाशनी: 2018-2019/2832

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä