जून 7, 2019
कोटक महिंद्र बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (हा अधिनियम) कलम 27 (2) व कलम 35 अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), आदेश दि. जून 6, 2019 अन्वये, कोटक महिंद्र बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.20 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, त्या बँकेने, त्यात आरबीआयने दिलेल्या सूचनांचे/निर्देशांचे अनुपालन न केल्याने लावण्यात आला आहे. तसेच हा दंड, ह्या अधिनियमाच्या कलम 46 (4) (आय) सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन करण्यास वरील बँकेने केलेली कसुरी विचारात घेऊन लावण्यात आला आहे.
ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून तिचा संबंध, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करारांशी नाही.
पार्श्वभूमी
वरील बँकेच्या प्रायोजकांनी धारण केलेल्या समभागांची माहिती सादर करण्यास, व प्रायोजकांच्या समभाग धारणाच्या डायल्युशनसाठी, परवानगीप्राप्त कालावधीत ती बँक कोणती कृती/योजना/डावपेच प्रस्तुत करत आहे ह्याबाबतचा तपशील सादर करण्यास त्या बँकेला आरबीआयकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, दिलेल्या कालावधीनुसार असे डायल्युशन करण्याबाबतचे तिचा शब्द/वचन सादर करण्यास वरील बँकेला सांगण्यात आले होते. तथापि, वरील बँकेने संदर्भित निर्देशांचे पालन न केल्याने तिच्यावर दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत एक नोटिस (एससीएन) त्या बँकेला देण्यात आली होती. वरील बँकेकडून मिळालेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीदरम्यान त्या बँकेने केलेली सादरीकरणे व दिलेले कागदपत्र विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या सूचना/निर्देशांचे वरील बँकेने पालन केले नाही व त्यासाठी तिला दंड लावण्याचे ठरविण्यात आले.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2896 |