जून 14, 2019
वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद, महाराष्ट्र, ह्यांचेवरील निर्देशांना मुदतवाढ
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने जनहिताच्या दृष्टीने, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना, नोव्हेंबर 13, 2017 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना आणखी तीन महिन्यांची, म्हणजे जून 14, 2019 ते सप्टेंबर 13, 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ह्या निर्देशानुसार, निकासी/ठेवींचा स्वीकार ह्यावर काही मर्यादा/निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबू ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे असा घेतला जाऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचे बँकिंग व्यवसाय करणे निर्बंधांसह सुरु ठेवू शकते.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2953 |