जून 18, 2019
एचडीएफसी बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आदेश दि. जून 13, 2019 अन्वये, एचडीएफसी बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर, रु.10 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) नॉर्म्स व फसवणुकी कळविणे ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केल्याबाबत लावण्यात आला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(आय) सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, व आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केल्याचे विचारात घेऊन, आरबीआयने हा दंड लागु केला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
विदेशी मुद्रेचे प्रेषण करण्यासाठी काही आयातदारांकडून वरील बँकेला खोटे/बनावट बिल ऑफ एंट्रीज (बीओई) सादर केले जाण्याबाबत एक संदर्भ सीमाशुल्क विभागाकडून आरबीआयला मिळाला होता. ह्याबाबत केलेल्या तपासणीत, केवायसी/एएमएल नॉर्म्स वरील व फसवणुकी कळविणे ह्यावरील आरबीआयच्या सूचनांचे उल्लंघन केले गेल्याने आढळून आले आणि वरील सूचनांचे अनुपालन न केले जाण्यामुळे आर्थिक दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत एक नोटिस वरील बँकेला देण्यात आली होती.
त्या बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीतील सादरीकरणे आणि वैय्यक्तिक सुनावणीनंतर वरील बँकेने केलेली अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केले गेल्याचे सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2974 |