जून 25, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस)च्या कलम 35 अ खालील निर्देश - श्री आनंद को-ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने (निर्देश दि. जून 21, 2019 अन्वये) श्री आनंद को-ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, आरबीआयच्या निर्देशातील अटींवर, ठेवीदारांना, प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्री आनंद को-ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र. रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे देऊ शकणार नाही, किंवा नूतनीकरण करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवींचा स्वीकार ह्यासह कोणतीही जबाबदारी घेणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारीचे पालन म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा तसे करण्यास राजी असणार नाही; कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन, आरबीआयच्या दि. जून 21, 2019 रोजीच्या निर्देशांमध्ये अधिसूचित केले असल्या व्यतिरिक्त तिच्या कोणत्याही मालमत्ता किंवा अॅसेट्स विकणार नाही किंवा त्यांची वासलात लावणार नाही. वरील बँकेचे, जून 25, 2019 चे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे निर्देश जारी असतील.
आरबीआयने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहे. जून 21, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/3034 |