Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (320.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 26/06/2019
वैध चलन म्हणून जनता सर्व नाण्यांचा स्वीकार करु शकते - आरबीआय

जून 26, 2019

वैध चलन म्हणून जनता सर्व नाण्यांचा स्वीकार करु शकते - आरबीआय.

भारत सरकारने टाकसाळीत पाडलेल्या नाण्यांचे प्रसारण भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. जनतेची गरज भागविण्यासाठी, नवीन मूल्यातील नाणी व निरनिराळ्या विषयांवरील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नवीन डिझाईन्स असलेली नाणी वेळोवेळी दिली जात असतात. नाणी ही अधिक कालावधीदरम्यान प्रसारात राहत असल्याकारणाने, निरनिराळ्या आकारांची व डिझाईन्सची नाणी एकाच वेळी प्रसारात/व्यवहारात येत असतात. सध्या, 50 पैसे, रु.1/-, 2/-, 5/- व 10/- मूल्याची निरनिराळ्या आकारांची, विषयांची व डिझाइन्सची नाणी प्रसारात आहेत.

असे समजण्यात आले आहे की, काही क्षेत्रात/बाबतीत ह्या नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका असल्याकारणाने, ही नाणी स्वीकारण्यास व्यापारी, दुकानदार व जनताही हयगय करते. ह्यामुळे देशाच्या काही भागात ह्या नाण्यांच्या मुक्त उपयोगावर व प्रसारणावर विपरीत परिणाम झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक जनतेला विनंती/आवाहन करते की त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही हयगय न करता, त्यांच्या सर्व व्यवहारांमध्ये, ही नाणी, एक वैध चलन म्हणून स्वीकारणे सुरु ठेवावे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डीसी एम(एनइ)क्र.जी-2/08.07.18/2018-19 जुलै 2, 2018 रोजी व जानेवारी 14, 2019 रोजी अद्यावत केलेल्या सूचनांनुसार, ही नाणी व्यवहारांमध्ये स्वीकारण्यासाठी व बदलून देण्यासाठी बँकांना पुनश्च कळविले आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/3056

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä