जून 28, 2019
आरबीआयकडून नवी दिल्ली येथे तिस-या लोकपाल कार्यालयाची स्थापना
डिसेंबर 5, 2018 रोजीच्या नाणेविषयक धोरण निवेदनात घोषित केल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जानेवारी 31, 2019 रोजी डिजिटल व्यवहारांसाठीची लोकपाल योजना (ओएसडीटी) सुरु केली.
बँकिंग लोकपाल योजना व ओएसडीटी ह्या खालील तक्रार-निवारणाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने, बँकिंग लोकपाल (बीओ) व डिजिटल व्यवहारांसाठी बँकिंग लोकपाल (ओडीटी) चे तिसरे कार्यालय नवी दिल्ली (नवी दिल्ली –3) येथे सुरु केले आहे. हे कार्यालय जुलै 1, 2019 पासून कार्यान्वित होईल.
नवी दिल्ली 1, 2 व 3 साठीचे क्षेत्रीय अधिकारक्षेत्र व नवी दिल्ली येथील बीओ व ओडीटीचे ई-मेल आयडी, जुलै 1, 2019 पासून खालीलप्रमाणे असतील :
एप्रिल 26, 2019 च्या प्रेस प्रकाशनात घोषित केल्यानुसार, अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठीच्या लोकपाल योजनेखालील क्षेत्रीय अधिकारक्षेत्रात कोणताही बदल नाही.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/3085 |