जुलै 9, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा - वैधताकाल मुदतवाढ.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहिताच्या दृष्टीने, श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना निर्देश दिले होते. हे निर्देश, जानेवारी 2, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, पुनरावलोकनाच्या अटीवर जुलै 2, 2019 पर्यंत जारी होते.
जनहिताच्या दृष्टीने, श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना दिलेल्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांची, म्हणजे जुलै 3, 2019 ते जानेवारी 2, 2020 पर्यंतची मुदतवाढ देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे. ह्या निर्देशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/93 |