ऑगस्ट 2, 2019
कॉर्पोरेशन बँक ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
जुलै 31, 2019 रोजीच्या एका आदेशान्वये भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कॉर्पोरेशन बँक ह्यांचेवर (ती बँक) रुपये एक कोटीचा आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, (1) बँकांमधील सायबर सुरक्षा साचा आणि (2) वाणिज्य बँका व निवडक वित्तसंस्थांद्वारे फसवणुकींचे वर्गीकरण व अहवाल ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केले गेले असल्याने लावण्यात आला आहे.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (तो अधिनियम) कलम 46 (4)(आय) व कलम 51 (1) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन लागु करण्यात आला आहे. ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
रद्द करण्यात आलेल्या एका डेबिट कार्डाचा वापर करुन केलेल्या फसवणुकीच्या व्यवहारांबाबत वरील बँकेने सादर केलेल्या सायबर सुरक्षा प्रसंगाच्या अहवालावरुन दिसून आले की, बँकांमधील सायबर सुरक्षा साचा आणि वाणिज्य बँका व निवडक वित्तसंस्थांद्वारे फसवणुकींचे वर्गीकरण व अहवाल ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन वरील बँकेकडून करण्यात आले नव्हते. आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न करण्यात आल्याने दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्याबाबत आरबीआयने वरील बँकेला एक नोटिस पाठविली होती. ह्यावर त्या बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीत केलेली सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केले गेल्याने वरील दावे सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/331 |