Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (202.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/08/2019
शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ

ऑगस्ट 14, 2019

शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आदेश दि. मे 18, 2018 अन्वये) शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना, मे 19, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, निर्देश दि. ऑगस्ट 5, 2019 अन्वये, वरील निर्देश, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, ऑक्टोबर 19, 2019 पर्यंत लागु असतील.

ही मुदतवाढ देणा-या वरील निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/437

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä