Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (288.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/08/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर को-ऑपरेटिव बँक लि. (महाराष्ट्र) - सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

ऑगस्ट 16, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - डॉ.
शिवाजीराव पाटील निलंगेकर को-ऑपरेटिव बँक लि. (महाराष्ट्र) - सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर को-ऑपरेटिव बँक लि., निलंगा, जिल्हा - लातुर, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 16, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, ऑगस्ट 15, 2019 पर्यंत सहा महिन्यांसाठी निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना आणखी दोन महिन्यांची, म्हणजे ऑगस्ट 16, 2019 ते ऑक्टोबर 15, 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ह्या निर्देशांमध्ये ठेवींची निकासी/स्वीकार ह्याबाबत काही निर्बंध आणि/किंवा मर्यादांच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. परिस्थितींवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा लावण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/457

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä