Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (207.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/08/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ - ठेवी खात्यांच्या निकासी मर्यादेत शिथिलता

ऑगस्ट 20, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन
बँक लि., अडूर, केरळ - ठेवी खात्यांच्या निकासी मर्यादेत शिथिलता

भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश दि. नोव्हेंबर 2, 2018 अन्वये, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांना निर्देशांखाली ठेवले होते. ह्या निर्देशांनुसार, प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.2,000/- (रुपये दोन हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयच्या वरील निर्देशांमधील अटींवर, ठेवीदारांना परवानगी देण्यात आली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेच्या आर्थिक स्थितीचे आता पुनरावलोकन केले असून जनतेच्या हिताच्या दृष्टीने वरील निर्देशात बदल करणे आवश्यक असल्याचा विचार केला आहे. त्यानुसार, ऑगस्ट 13, 2019 रोजीच्या सुधारित केलेल्या निर्देशान्वये व बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांना, नोव्हेंबर 2, 2018 रोजी देण्यात आलेल्या निर्देशाचा परिच्छेद 1 (आय) मध्ये सुधारणा/बदल केला जावा आणि ह्यापुढे, प्रत्येक बचत ठेव खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, आरबीआयच्या ऑगस्ट 13, 2019 रोजीच्या निर्देशातील अटींवर, ठेवीदारांना रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2, 2018 रोजीच्या निर्देशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/477

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä