ऑगस्ट 2, 2019
स्वर्ण भारती सहकार बँक नियमित, बेंगलुरु ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
जुलै 25, 2019 रोजीच्या एका आदेशान्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) स्वर्ण भारती सहकार बँक नियमित, बेंगलुरु (ती बँक) ह्यांचेवर रु.10 लाख दंड लागु केला असून, तो दंड, ‘तृतीय पक्षीय अकाऊंट पेयी चेक्सचे संकलन’ ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केल्याने लावण्यात आला आहे.
आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन न केले गेल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 46 (4)(आय) व 56 सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आलेल्या तक्रारींवर आधारित, स्वर्ण भारती सहकार बँक नियमित, बंगळुरु (ती बँक) ह्यांच्या पुस्तकांची व लेखांची आरबीआयने तपासणी केली व त्यात इतर बाबींबरोबर, आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करुन रु.50,000/- पेक्षा अधिक रक्कमांचे, क्रेडिट सोसायट्यांच्या नावे तृतीय पक्षीय अकाऊंट पेयी चेक्स गोळा केल्याचे दिसून आले. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे उल्लंघन केले गेले असल्याने त्या बँकेवर दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्याबाबतची नोटीस वरील बँकेला देण्यात आली होती.
ह्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीमधील तोंडी सादरीकरणे व वैय्यक्तिक सुनावणीनंतर केलेली अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेऊन, आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयच्या सूचनांचे अनुपालन न केल्याचा वरील दावा सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/335 |