Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (206.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/07/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

जुलै 31, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि.
मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

निर्देश दि. मार्च 30, 2017 अन्वये, दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, मार्च 30, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी निर्देश दि. जानेवारी 24, 2019 अन्वये, जुलै 31, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, निर्देश दि. जानेवारी 24, 2019 अन्वये वैधता वाढविलेले, निर्देश दि. मार्च 30, 2017 वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे, ऑगस्ट 1, 2019 ते जानेवारी 31, 2020 पर्यंत लागु असतील.

संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील मुदतवाढ दिली असलेल्या निर्देश दि. जुलै 23, 2019 ची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ/फरक याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/300

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä