Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (223.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/09/2019
युपी सिव्हिल सेक्रेटरियट प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (उत्तर प्रदेश) ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांच्या वैधतेला आरबीआयकडून मुदतवाढ

सप्टेंबर 25, 2019

युपी सिव्हिल सेक्रेटरियट प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (उत्तर प्रदेश) ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांच्या
वैधतेला आरबीआयकडून मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) युपी सिव्हिल सेक्रेटरियट प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (उत्तर प्रदेश) ह्यांना दिलेल्या निर्देशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर सहा महिन्यांची, म्हणजे, सप्टेंबर 26, 2019 ते मार्च 25, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली, निर्देश दि. सप्टेंबर 19, 2018 अन्वये, वरील बँक, सप्टेंबर 25, 2018 पासून निर्देशाखाली होती.

सप्टेंबर 25, 2019 पर्यंत देण्यात आलेल्या वरील निर्देशाची वैधता आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे सप्टेंबर 26, 2019 पासून ते मार्च 25, 2020 पर्यंत, सप्टेंबर 24, 2019 रोजीच्या निर्देशान्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली आहे. सप्टेंबर 24, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने निर्देशात बदल केला ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/785

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä