युनायटेड ओव्हरसीज बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु |
ऑक्टोबर 3, 2019
युनायटेड ओव्हरसीज बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आदेश दि. ऑक्टोबर 1, 2019 अन्वये, युनायटेड ओव्हरसीज बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु. एक कोटी एवढा आर्थिक दंड लागु केला असून तो दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (हा अधिनियम) कलम 10ब च्या तरतुदींचे पालन न केले गेल्याने, लावण्यात आला आहे. ह्या अधिनियमांच्या वरील तरतुदींचे अनुपालन वरील बँकेने केले नसल्याचे विचारात घेऊन, ह्या अधिनियमाच्या कलम 46 (4) (आय) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी संबंधित नाही.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/854 |
|