Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (266.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/10/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ - दि मुधोळ को-ऑपरेटिव बँक लि. मुधोळ

ऑक्टोबर 11, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांना मुदतवाढ - दि मुधोळ को-
ऑपरेटिव बँक लि. मुधोळ.

निर्देश दि. एप्रिल 2, 2019 अन्वये, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली, दि मुधोळ को-ऑपरेटिव बँक लि. मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक ह्यांना निर्देश दिले होते.

दि मुधोळ को-ऑपरेटिव बँक लि. मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक ह्यांना एप्रिल 2, 2019 रोजी देण्यात आलेल्या निर्देशांच्या कार्यकालास मुदतवाढ देणे जनतेच्या हितासाठी आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले असून, त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि मुधोळ को-ऑपरेटिव बँक लि. मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक ह्यांना दि. एप्रिल 2, 2019 रोजी दिलेले निर्देश, त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर त्या बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे, ऑक्टोबर 8, 2019 ते एप्रिल 7, 2020 पर्यंत लागु असतील.

संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

(योगेश दयाल)    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/919

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä