Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (269.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/10/2019
लक्ष्मी विलास बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 14, 2019

लक्ष्मी विलास बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आदेश दि. ऑक्टोबर 14, 2019 अन्वये, लक्ष्मी विलास बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.1 कोटी दंड लागु केला असून, तो दंड, आरबीआयने “उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) नॉर्म्स” वर दिलेल्या काही सूचनांचे अनुपालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(आय) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.

ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही.

पार्श्वभूमी

मार्च 31, 2017 रोजी असलेल्या वरील बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात केलेल्या वैधानिक तपासणीत, इतर बाबींसह आढळून आले की, वरील बँकेने “उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) नॉर्म्स” वर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही. वरील बँकेला एक नोटिस देऊन त्यात, वरील सूचनांचे अनुपालन न केल्याबद्दल त्या बँकेला दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. ह्या नोटिसीला त्या बँकेने दिलेले उत्तर व अतिरिक्त सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, वरीलप्रमाणे अनुपालन न केले गेल्याबद्दल तिला आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल)    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/940

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä