Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (117.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/10/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद, महाराष्ट्र - मुदतवाढ

ऑक्टोबर 16, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - वसंतदादा नागरी सहकारी बँक लि.
उस्मानाबाद, महाराष्ट्र - मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहिताच्या दृष्टीने, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना नोव्हेंबर 13, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी साडेतीन महिन्यांची म्हणजे, ऑक्टोबर 14, 2019 ते जानेवारी 31, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ह्या निर्देशांमध्ये, ठेवींची निकासी/स्वीकार ह्यावर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादांच्या अटी घालण्यात आल्या आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. तिची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत वरील बँक, तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/963

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä