Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (270.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/10/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

ऑक्टोबर 16, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव बँक
लि. मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

निर्देश दि. एप्रिल 17, 2018 अन्वये, दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना, एप्रिल 17, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी व शेवटच्या एप्रिल 9, 2019 रोजीच्या निर्देशान्वये ती ऑक्टोबर 17, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना, दि. एप्रिल 17, 2018 रोजी देण्यास आलेले, वेळोवेळी सुधारित केले गेलेले व शेवटून ऑक्टोबर 17, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, वरील बँकेला, ऑक्टोबर 15, 2019 रोजीच्या निर्देशान्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे ऑक्टोबर 18, 2019 ते एप्रिल 17, 2020 पर्यंत लागु असतील.

संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील मुदतवाढ कळविणा-या ऑक्टोबर 15, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या वरील मुदतवांढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/968

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä