ऑक्टोबर 25, 2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र
निर्देश दि. ऑक्टोबर 26, 2018 अन्वये नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, ऑक्टोबर 29, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता, शेवटून, निर्देश दि. एप्रिल 24, 2019 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांसाठी, म्हणजे ऑक्टोबर 29, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असणारा) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, दि. ऑक्टोबर 26, 2018 रोजी देण्यास आलेले, वेळोवेळी सुधारित केले गेलेले व शेवटून ऑक्टोबर 29, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, वरील बँकेला, ऑक्टोबर 16, 2019 रोजीच्या निर्देशान्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे ऑक्टोबर 30, 2019 ते एप्रिल 29, 2020 पर्यंत लागु असतील.
संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ कळविणा-या ऑक्टोबर 16, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या वरील मुदतवांढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/1030 |