ऑक्टोबर 25, 2019
तामिळनाड मर्कंटाईल बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आदेश दि. ऑक्टोबर 24, 2019 अन्वये, तामिळनाड मर्कंटाईल बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु. 35 लाख (रुपये पस्तीस लाख) एवढा आर्थिक दंड लागु केला असून तो दंड, आरबीआयने, “भारतीय रिझर्व्ह बँक (वाणिज्य बँका व निवडक वित्त संस्थांद्वारे फसवणुकींचे वर्गीकरण व अहवाल पाठविणे) निर्देश, 2016” तो दंड बँकिंग विनियामक अधिनियम 1949 वरील तरतुदींचे अनुपालन वरील बँकेने केले नसल्याचे विचारात घेऊन ह्या अधिनियमाच्या कलम 46(4) (आय) सहवाचित कलम 47अ (1) (क) खाली आरबीआय ला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
वरील बँकेच्या मार्च 31, 2017 रोजी असलेल्या वित्तीय स्थितीच्या वैधानिक तपासणी दरम्यान आढळून आले की, वरील बँकेने, “भारतीय रिझर्व्ह बँक (वाणिज्य बँका व निवडक वित्त संस्थांद्वारे फसवणुकीचे वर्गीकरण व अहवाल पाठविणे) निर्देश, 2016” वर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन केलेले नाही. ह्या तपासणी रिपोर्टच्या आधारावर वरील बँकेला एक नोटिस देण्यात आली होती व वरील सूचनांचे अनुपालन न केल्याबाबत तिला दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. ह्या नोटीसीला वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीत दिलेली सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, वरील अनुपालन न केल्याबाबत आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/1038 |