ऑक्टोबर 29, 2019
जनता सहकारी बँक लि. पुणे ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व्ह बँकेने, (आरबीआय), आदेश दि. ऑक्टोबर 16, 2019 अन्वये, जनता सहकारी बँक लि. पुणे ह्यांना (ती बँक) रु.1 कोटी दंड लागु केला असून तो दंड उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आरआरएसी) नॉर्म्स, अग्रिम राशींचे व्यवस्थापन व एक्सपोझर नॉर्म्स आणि वैधानिक/इतर निर्बंध ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे अनुपालन वरील बँकेने केले नसल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4) (आय) व कलम 56 सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करारांच्या वैधतेशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
वरील बँकेच्या मार्च 31, 2018 रोजी असलेल्या वित्तीय स्थिती संदर्भात आरबीआयने केलेल्या वैधानिक तपासणीत आढळून आले की, वरील बँकेने, आयआरएसी नॉर्म्स, अग्रिम राशींचे व्यवस्थापन व एक्सपोझर नॉर्म्स आणि वैधानिक/इतर निर्बंध व एटीएम कम डेबिट कार्डे देणे ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही. वरील बँकेला एक नोटिस पाठवून त्यात, वरील सूचनांचे अनुपालन न केल्याबद्दल तिला आर्थिक दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्यात त्या बँकेला सांगण्यात आले होते. ह्यावर त्या बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीत केलेली तोंडी सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आयआरएसी नॉर्म्स, अग्रिम राशींचे व्यवस्थापन व एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर निर्बंध ह्यावर देण्यात आलेल्या सूचनांचे अनुपालन न केल्याचे वरील दावे सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/1049 |