Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (270.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/11/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि अडूर को - ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ - मुदतवाढ

नोव्हेंबर 6, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि अडूर को - ऑपरेटिव
अर्बन बँक लि., अडूर, केरळ - मुदतवाढ

बीआर अधिनियम (एएसीएस) च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांना, निर्देश डीसीबीएस.सीओ.पीसीसी डी-4/12.26.004/2018-19दि. नोव्हेंबर 2, 2018 अन्वये, नोव्हेंबर 9, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देश दिले होते आणि निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी-43/12.26.004/2018-19 दि. मे 3, 2019 अन्वये आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत वाढविण्यात आले होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन केले असून, जनतेच्या हिताच्या दृष्टीने वरील निर्देशांना मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचा विचार केला आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, निर्देश डीओआर.सीओ.एआयडी/क्र .डी-36/12.26.004/2019-20 दि. नोव्हेंबर 5, 2019 अन्वये भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, ह्यांना देण्यात आलेले व शेवटून नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश डीसीबीएस.सीओ.पीसीसी.डी-4/12.26.004/2018-19 दि. नोव्हेंबर 2, 2018, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 10, 2019 ते मे 9, 2020 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील. संदर्भित निर्देशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1119

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä