Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (270.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 08/11/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - सीकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सीकर, राजस्थान - वैधता मुदतवाढ

नोव्हेंबर 8, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - सीकर अर्बन को-ऑपरेटिव
बँक लि., सीकर, राजस्थान - वैधता मुदतवाढ

निर्देश दि. ऑक्टोबर 26, 2018 अन्वये, सीकर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सीकर, राजस्थान ह्यांना, नोव्हेंबर 9, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. निर्देश दि. मे 2, 2019 अन्वये, वरील निर्देशांची वैधता, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला देण्यात आलेले व नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश दि. ऑक्टोबर 26, 2018, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 10, 2019 ते मे 9, 2020 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ कळविणा-या निर्देश दि. ऑक्टोबर 30, 2019 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

आरबीआयने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1146

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä