जानेवारी 31, 2020
शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय./डी-6/12.22.351/2017-18 दि. मे 18, 2018 अन्वये) शिवम सहकारी बँक लि. इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना, मे 19, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.
(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, निर्देश डीओआर.सीओ.एआयडी.डी-50/12.22.351/2019-20 दि. जानेवारी 29, 2020 अन्वये, निर्देश, वरील बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर, मार्च 31, 2020 पर्यंत लागु असतील.
(3) वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या वरील निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
(4) भारतीय रिझर्व बँकेने केलेली मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये
योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2019-2020/1852 |