Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (287.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/02/2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
रूपी को - ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र

28 फेब्रुवारी 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
रूपी को - ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलेल्या निर्देश सं. यूबीडी.सीओ.बीएसडी-I/डी-28/12.22.218/2012-13 च्या अनुषंगाने रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र, वर दिनांक 22 फेब्रुवारी 2013 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 20 नोव्हेंबर 2019 च्या सुधारित निर्देश सं.डीओआर.एआईडी/डी-40/12.22.218/2019-20 अनुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलेल्या निर्देश सं.यूबीडी.सीओ.बीएसडी-I/डी-28/12.22.218/2012-13 व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशांचा वैधता कालावधी जो दिनांक 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 26 फेब्रुवारी 2020, च्या सुधारित निर्देश सं.डीओआर.एआईडी/डी-57/12.22.218/2019-20 द्वारा दिनांक 01 मार्च 2020 ते दिनांक 31 मे 2020 पर्यंत तीन महिन्यासाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक 26 फेब्रुवारी 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2003

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä