29 एप्रिल 2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
दि नीड्स ऑफ लाइफ को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-3/12.22.163/2018-19 च्या अनुषंगाने दि नीड्स ऑफ लाइफ को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 29 ऑक्टोबर 2018 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महीन्या पर्यंत दिशानिर्देश लादण्यात आले होते आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 16 ऑक्टोबर 2019 च्या सुधारित निर्देश सं. DCBR.CO.AID/No.D-31/12.22.160/2019-20 अनुसार दिनांक 29 एप्रिल 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला होता जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन आहे.
2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-3/12.22.163/2018-19 अनुसार निर्देशाचा वैधता कालावधी जो नंतर दिनांक 29 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला होता, तो दिनांक 24 एप्रिल 2020 च्या सुधारित निर्देश सं DOR.CO.AID/No.D-76/12.22.160/2019-20 द्वारा दिनांक 30 एप्रिल 2020 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 24 एप्रिल 2020 च्या सुधारित निर्देश सं DOR.CO.AID/No.D-76/12.22.160/2019-20 ची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
4. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2286 |