28 मे 2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35 ए अंतर्गत निर्देश-
रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलेल्या निदेश सं. UBD.CO.BSD-I/D-28/12.22.218/2012-13 च्या अनुषंगाने रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र, वर दिनांक 22 फेब्रुवारी 2013 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 26 फेब्रुवारी 2020 च्या सुधारित निर्देश सं DOR.AID/D-57/12.22.218/2019-20 अनुसार दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलेल्या निदेश सं.UBD.CO.BSD-I/D-28/12.22.218/2012-13 व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशाचा वैधता कालावधी जो दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 26 मे 2020, च्या सुधारित निदेश सं DOR.AID/D-82/12.22.218/2019-20 द्वारा दिनांक 01 जून 2020 ते दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत तीन महिनांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 26 मे 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
4. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निदेशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2414 |