Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (368.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/06/2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार- दी कराड जनता सहकारी बँक लिमिटेड., कराड़, महाराष्ट्र

09 जून 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार- दी कराड जनता सहकारी बँक लिमिटेड., कराड़, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिनांक 7 नोव्हेंबर, 2017 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-1/D-4/12.22.126/2017-18 च्या अनुषंगाने कराड़ जनता सहकारी बँक लिमिटेड., कराड़, महाराष्ट्र वर दिनांक 9 नोव्हेंबर, 2017 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी दिशानिर्देश लादण्यात आले होते. वरील निर्देशाची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आली होती . दिनांक 04 मार्च 2020 रोजी दिलेल्या अंतिम निर्देश सं. DCBR.CO.AID.No/D-59/12.22.126/2018-19 च्या अनुषंगाने निर्देशाची वैधता दिनांक 09 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे कि, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 च्या कलम 35A, उप कलम (1) अनुसार आणि कलम 56 (सहकारी संस्था संदर्भात) लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून तत्सम बँकेला असा आदेश देत आहे की दिनांक 07 नोव्हेंबर 2017 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBR.CO.AID/No.D-4/12.22.126/2018-19 च्या अनुषंगाने कराड़ जनता सहकारी बँक लिमिटेड., कराड़, महाराष्ट्र, वर जे दिशानिर्देश लादण्यात आले होते त्याची वैधता वेळोवेळी सूधारित केली गेली ज्यामधे सरते शेवटी दिनांक 9 जून 2020 पर्यंत ती वाढवण्यात आली होती .आता पुन्हा दिनांक 03 जून, 2020 च्या सुधारित निर्देश सं. DCBR.CO.AID/No.D-59/12.22.126/2019-20 नुसार ती वैधता 10 जून 2020 पासून 9 सप्टेंबर 2020 पर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे आणि ती पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत.

4. दिनांक 03 जून 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या परीसरात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

5. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2473

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä