19 जून 2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता कलम 35 A अंतर्गत निर्देश -
यूथ डेव्हलपमेंट को. ऑ. बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र -
ठेवीदारांसाठी पैसे काढण्याची मर्यादा वाढविणे
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A, उप कलम (1) अनुसार, ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दिनांक 04 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या निर्देश सं.DCBS.CO.BSD-I/D-6/12.22.311/2018-19 च्या अनुषंगाने यूथ डेव्हलपमेंट को. ऑ. बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र, वर दिनांक 5 जानेवारी 2019 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून, सहा महिन्यांपर्यंत दिशानिर्देश लादले होते. विद्यमान दिशानिर्देशांनुसार प्रत्येक ठेवीदारास पैसे काढण्याची मर्यादा ₹5000/- आहे.
बँकेची तरलता स्थिती आणि ठेवीदारांना देय देण्याच्या क्षमतेचा आढावा घेऊन, दिनांक 19 जून 2020 च्या दिशानिर्देश क्र.DOR.CO.AID No.D-90/12.22.311.2019-20 अनुसार असा निर्णय घेतला आहे की पैसे काढण्याची मर्यादा प्रति ठेवीदारास ₹20,000/- (रुपये वीस हजार फक्त) पर्यंत, यापूर्वी परवानगी असलेल्या ₹5000/- च्या मर्यादेच्या समावेशासह वाढविण्यात आलेली आहे. वरील सवलती नुसार बँकेचे 76% हून अधिक ठेवीदार त्यांच्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम खात्यातून काढून घेऊ शकतील.
उपरोक्त संदर्भाधीन निर्देशांच्या इतर सर्व अटी व शर्ती या वेळोवेळी सुधारित केलेल्या निर्देशानुसार कायम राहतील.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2019-2020/2527 |