Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (286.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/08/2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटीना यथालागू), कलम 35 A अंतर्गत निर्देशांचा कालावधि चा विस्तार रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र

31 ऑगस्ट 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटीना यथालागू), कलम 35 A अंतर्गत निर्देशांचा
कालावधि चा विस्तार रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलेल्या निर्देश सं. UBD.CO.BSDI/D-28/12.22.218/2012-13 च्या अनुषंगाने रूपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे, महाराष्ट्र वर दिनांक 22 फेब्रुवारी 2013 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 25 ऑगस्ट 2020 च्या सुधारित निर्देश सं. DOR.AID/D-15/12.22.218/2020-21 द्वारा 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. वरील सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4. उपरोक्त दिशानिर्देशच्या मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2020-2021/257

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä