03, ऑक्टोबर 2020
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस), कलम 35 A अंतर्गत निदेश-
शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, महाराष्ट्र- कालावधी वाढविणे
भारतीय रिझर्व बँके ने दिनांक मे 03, 2019 रोजी दिलेल्या निदेश सं. DCBS.CO.BSD-I/D-14/12.22.254/2018-19 च्या अनुषंगाने शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, महाराष्ट्र, वर दिनांक मे 04, 2019 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यापर्यंत दिशानिदेश लादण्यात आले होते. ह्या निदेशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 31 जुलै 2020 च्या सुधारित निदेश सं DOR.CO.AID./No.D-10/12.22.254/2020-21 रोजी अनुसार, दिनांक 04 अक्तूबर 2020 पर्यंत वाढवण्यात आलेला होता.
2. जनतेच्या माहिती साठी सुचना देण्यातयेत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी संस्था संदर्भात), कलम 56 चे वाचनकरीता, कलम 35ए, उपकलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक मे 03, 2019 रोजी दिलेल्या निदेश सं. DCBS.CO.BSD-I/D-14/12.22.254/2018-19 वनंतर वेळो वेळी दिलेल्या सुधारित निदेशानुसार निदेशाचा वैधता कालावधी जो दिनांक 04 अक्तूबर, 2020 पर्यंत वाढ वला होता, तो दिनांक 30 सितंबर, 2020 च्या सुधारित निदेश सं DOR.CO.AID./No.D-24/12.22.254/2020-21 द्वारा दिनांक अक्तूबर 05, 2020 ते दिनांक दिसंबर 04, 2020 पर्यंत दोन महिन्या साठी वाढवला आहे, जो शिवाजीराव भोसले सहकारी बैंक लि., पुणे, आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
3. संदर्भाधीन निदेशातील इतरकोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 30 सितंबर, 2020 च्यासुधारित आदेशा चीप्रत बँकेच्याजागेत जनतेच्या माहिती साठी लावण्यात आलेली आहे.
4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढी मुळे आणि/किंवा आदेशातील परिवर्तना मुळे जनतेने असेगृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी : 2020-2021/430 |