Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (307.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/11/2021
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ खालील निदेशांना मुदतवाढ - सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लि., शिराळा, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र

नोव्हेंबर 03, 2021

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ खालील निदेशांना मुदतवाढ -
सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लि., शिराळा, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने, निदेश डीओएस.सीओ.युसीबीज-वेस्ट/डी-1/12.07.157/2020-21 दि. फेब्रुवारी 3, 2021 अन्वये, सर्जेरावदादा नाईक सहकारी बँक लि., शिराळा, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 3, 2021 रोजी व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निदेशांखाली ठेवले होते. त्यानंतर ह्या निदेशांची वैधता नोव्हेंबर 3, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निदेश देते की, निदेश डीओआर.एमओएन/डी45/12.07.157/2021-22 दि. नोव्हेंबर 3, 2021 अन्वये वरील निदेश त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, जानेवारी 3, 2022 पर्यंत लागु होत राहतील.

संदर्भित निदेशातील इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या निदेश दि. नोव्हेंबर 3, 2021 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या वरील मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2021-2022/1149

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä