Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (313.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2021
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

नोव्हेंबर 30, 2021

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - मराठा सहकारी बँक
लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने, निदेश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-4/12.22.141/2016-17 दि. ऑगस्ट 31, 2016 अन्वये, दि कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, ऑगस्ट 31, 2016 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निदेशांखाली ठेवले होते. वरील निदेशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व ती शेवटून नोव्हेंबर 30, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती.

(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निदेश देते की, निदेश डीओआर.एमओएन/डी-49/12.22.140/2021-22 दि. नोव्हेंबर 29, 2021 अन्वये वरील निदेश त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटींवर, फेब्रुवारी 28, 2022 पर्यंत लागु असतील.

(3) संदर्भित निदेशांमधील इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या दि. नोव्हेंबर 29, 2021 रोजीच्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात, जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या वित्तीय स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2021-2022/1282

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä