डिसेंबर 1, 2021
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - रुपी कोऑपरेटिव बँक
लि. पुणे, महाराष्ट्र - मुदतवाढ.
भारतीय रिर्झव्ह बँकेने निर्देश युबीडी.सीओ.बीएसडी-आय/डी-28/12.22.2018/2012-13 दि. फेब्रुवारी 21, 2013 अन्वये, रुपी कोऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र ह्यांना फेब्रुवारी 22, 2013 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व शेवटून ती नोव्हेंबर 30, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जात आहे की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिर्झव्ह बँक निर्देश देते की, निर्देश डीओआर.एमओएन/डी-50/12.22.218/2021-22 दि. नोव्हेंबर 29, 2021 अन्वये, वरील निर्देश, त्या बँकेला पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 28, 2022 पर्यंत लागु असतील.
संदर्भित निर्देशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या, दि. नोव्हेंबर 29, 2021 रोजीच्या निर्देशाचे एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
भारतीय रिर्झव्ह बँकेने दिलेल्या वरील मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या वित्तीय स्थितीबाबत भारतीय रिर्झव्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
(योगेश दयाल)
मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन: 2021-2022/1288 |