30 एप्रिल 2022
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A अंतर्गत निर्देश - दी कपोल
को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, - कालावधी वाढविणे
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 मार्च, 2017 रोजी दिलेल्या निर्देश सं.DCBS.CO.BSD-I./D-9/12.22.111/2016-17 च्या अनुषंगाने दी कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र वर दिनांक 30 मार्च, 2017 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महीन्या पर्यंत दिशानिर्देश लादण्यात आले होते. या नियमावलीचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आले असून 30 एप्रिल, 2022 पर्यंत हे नियम लागू होते.
2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A चे उप कलम (1) अनुसार, निहित अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की वरील दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 29 एप्रिल, 2022 च्या सुधारित निर्देश सं. DOR.MON.D-4/12.22.111/2022-23 द्वारा 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक दिनांक 29 एप्रिल, 2022 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
4. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2022-2023/137 |