15 जूलै 2022
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A अंतर्गत निदेश- सिटी को-
ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, - कालावधी वाढविणे
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-5/12.22.039/2017-18 च्या अनुषंगाने सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, वर दिनांक 17 एप्रिल 2018 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. या नियमावलीचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आले असून 16 जुलै 2022 पर्यंत हे नियम लागू होते.
2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 A चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 08 जुलै 2022 च्या सुधारित निर्देश सं. DOR.MON.D-19/12.22.039/2022-23 द्वारा 16 ऑक्टोबर, 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक 08 जुलै 2022 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.
(योगेश दयाल)
मुख्य महाप्रबंधक
प्रेस प्रकाशनी: 2022-2023/538
|