Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (294.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 22/07/2022
बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींवर भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे (RBI) अलर्ट (इशारा)

22 जुलै 2022

बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींवर भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे (RBI) अलर्ट (इशारा)

बचत / चालू खात्यांमधील जमा असलेली अशी शिल्लक रक्कम जी 10 वर्षां पेक्षा अधिक अवधि पासुन संचालित केली गेली नाही आहे, किंवा अशी मुदत ठेव जिच्यावर मुदतीच्या तारखेपासून 10 वर्षांच्या आत दावा नाही केला गेला आहे, अश्या शिल्लक रकमेला "दावा न केलेल्या ठेवी" म्हणून वर्गीकृत केले जाते. अश्या रकमा संबन्धित बँकांद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता” (DEA) निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, ठेवीदारांना नंतरच्या तारखेला ज्या बँकेत (बँकांमध्ये) अशा ठेवी ठेवल्या गेल्या होत्या, त्यांच्याकडून लागू व्याजासह ठेवींवर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र, बँकांकडून तसेच रिझर्व्ह बँकेतर्फे वेळोवेळी जनजागृती मोहिमा राबविल्या गेल्या असूनही, दावा न केलेल्या ठेवींची रक्कम वाढत चालली आहे.

दावा न केलेल्या ठेवींचे वाढते प्रमाण प्रामुख्याने बचत / चालू खाती जी ठेवीदारांना यापुढे चालवायची नाहीत ती बंद न केल्यामुळे किंवा परिपक्व मुदत ठेवींसाठी बँकांकडे विमोचन दावे प्रस्तुत न केल्यामुळे उद्भवते. अशी काही प्रकरणे देखील आहेत जी मृत ठेवीदारांची आहेत, जिथे नामनिर्देशित/कायदेशीर वारस संबंधित बँकेवर दावा करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा ठेवीदारांना किंवा मृत ठेवीदारांच्या नामनिर्देशित /कायदेशीर वारसांना ठेवी ओळखण्यासाठी आणि त्यावर दावा करण्यात मदत करण्यासाठी, बँका आधीच त्यांच्या वेबसाइटवर काही ओळखण्यायोग्य तपशीलांसह दावा न केलेल्या ठेवींची यादी होस्ट (प्रदर्शित) करतात. सामान्य नागरिकांना अशा ठेवींवर दावा करण्यासाठी संबंधित बँकेला ओळखण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/S84

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä