Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (297.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 12/12/2022
भारतीय रिजर्व बैंकेने वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा वर आर्थिक दंड ठोठावला

12 डिसेंबर 2022

भारतीय रिजर्व बैंकेने वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा वर आर्थिक दंड ठोठावला

भारतीय रिजर्व बैंकेने 08 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा (बँक) वर इन्कम रिकग्निशन, अॅसेट क्लासिफिकेशन, प्रोव्हिजनिंग आणि इतर संबंधित बाबी (IRAC मानदंड) वर भारतीय रिजर्व बैंकेने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे 2 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46 (4) (i) आणि 56 सह लागू असलेल्या कलम 47 A (1) (c) अन्वये भारतीय रिजर्व बैंकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कृती नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि यामधे बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा हेतू नाही.

पार्श्वभूमी

31 मार्च 2021 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आरबीआयने बँकेची केलेली वैधानिक तपासणी आणि जोखीम मूल्यांकन अहवाल, तपासणी अहवाल आणि त्याच्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहाराची तपासणी, यावरून असे निदर्शनास आले की, बँकेने IRAC नियमांनुसार काही कर्ज खाती नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता म्हणून वर्गीकृत केलेली नाहीत. त्यानंतर, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती ज्यात बँकेला त्यात नमूद केल्याप्रमाणे RBI निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का लागू करू नये याची कारणे दाखवा अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेचे उत्तर, बँकेचे अतिरिक्त सादरिकरण आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेले तोंडी सादरिकरण यांचा विचार केल्यानंतर, RBI ने निष्कर्ष काढला की वरील प्रमाणे भारतीय रिजर्व बैंकेच्या निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे आणि अशा निर्देशांचे पालन न करण्याच्या मर्यादेपर्यंत आर्थिक दंड आकारला जाणे आवश्यक आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1356

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä